वैज्ञानिक अभ्यासपद्धती
रूढ अर्थाने प्रयोग आणि/किंवा निरीक्षणावर आधारित केलेला अभ्यास हा वैज्ञानिक अभ्यास म्हणता येईल. अशा अभ्यासात एक शिस्त असावी लागते. निरीक्षणे घेणारा वा प्रयोग करणारा हा कोणताही पूर्वग्रह न ठेवता प्रामाणिकपणे व तटस्थ राहून निरीक्षणे घेणारा असावा ही अशा अभ्यासाची पूर्व अट आहे. तरीदेखील या निरीक्षणांकडे कायम कठोर संशयवृत्तीने (scepticism) बघितल्या जाते; कारण मानवी आकलन आणि …